जिल्हा कोषागारातर्फे निवृत्तीवेतनधारकांसाठी आज कार्यशाळा

जिल्हा कोषागारातर्फे निवृत्तीवेतनधारकांसाठी आज कार्यशाळा अकोला, दि. १२ : जिल्हा कोषागारातर्फे राज्य शासन निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, तसेच सर्व आहरण व संवितरण अधिका-यांसाठी कार्यशाळा व पेंशन अदालत मंगळवारी, दि. १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात होईल. सेवा संकल्प अभियानात हा उपक्रम असून, कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी ११ वा. होणार आहे. त्यानंतर ‘डीडीओं’ची कार्यशाळा होऊन त्यात ई-पीपीओ, ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली, थेट प्रकरण स्थिती ट्रॅकिंग, निवृत्तीवेतनधारक समाधान यासारख्या उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर दु. २.३० वा. निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीधारकांसाठी पेन्शन अदालत होऊन संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात येईल. सर्व निवृत्तीधारक व कुटुंब निवृत्तीधारकांनी, तसेच सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांनी केले आहे. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा