जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’ २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम;



अकोला, दि. १५ : जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे, जलसंधारणाला प्रोत्साहन देणे आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या निर्देशानुसार २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही हे अभियान सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, यासंदर्भात कृषी आयुक्तालयाने विभागीय व जिल्हास्तरीय कार्यालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

*मातीचे आरोग्य, शाश्वत शेतीचा पाया*

शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीची सुपीकता आणि मृदा आरोग्य जपणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक विविधीकरण, पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, आत्मा आणि कृषी विद्यापीठे यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येईल.

*पीक विविधीकरण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन*

या अभियानांतर्गत तेलबिया, कडधान्ये आणि फलोत्पादन पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार आहे. भात पिकानंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्राचा कार्यक्षम वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच पीक अवशेषांचे व्यवस्थापन करून पराटी, पेंढा व इतर अवशेष जाळण्याऐवजी त्यांचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

सेंद्रिय व नैसर्गिक निविष्ठांचा वापर, नैसर्गिक शेतीच्या पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित केली जातील. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच जमिनीची सुपीकता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

*प्रक्षेत्र भेटी, शेतकरी मेळावे आणि प्रशिक्षणांचे आयोजन*

अभियानाच्या कालावधीत क्षेत्रीय स्तरावर प्रक्षेत्र भेटी, शेतकरी प्रशिक्षण, मेळावे आणि प्रत्यक्ष शेतावरील प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. माती परीक्षणावर आधारित पोषण व्यवस्थापन, मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर, खतांचा संतुलित वापर, खत विक्रीविषयक नियमांची माहिती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीटकनाशकांचा योग्य वापर या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.

याशिवाय ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेतून सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन, जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण व साठवणूक, शाश्वत शेती पद्धती आणि पीक विविधीकरणाबाबत जनजागृती करण्यात येईल.

*शेतकरी ओळखपत्र आणि पीक विमा योजनेबाबत मार्गदर्शन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा