जिल्हाधिका-यांची मोर्णा प्रकल्पाला भेट पेयजलासाठी सर्वोच्च प्राधान्य जिल्हाधिकारी वर्षा मीना
जिल्हाधिका-यांची मोर्णा प्रकल्पाला
भेट
पेयजलासाठी सर्वोच्च प्राधान्य
जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. २३ : मानवी जीवन आणि पशुधनासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध
करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मोर्णा प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी
राखीव असून, पाण्याचा अपव्यय होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी
आज दिले.
जिल्हाधिका-यांनी पातूरनजिक मोर्णा प्रकल्पाला
भेट देऊन उपलब्ध साठा, आवश्यकता व नियोजन आदींची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक
नागरिकांशी संवादही साधला.
मोर्णा प्रकल्प क्षेत्रातील
शेतकऱ्यांना आपल्या फळबागा आणि शेतीपिके वाचवण्यासाठी नवीन विहीर किंवा विंधनविहीरी खोदण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या
पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तसा सुधारित आदेश यापूर्वीच काढला आहे. तथापि,
जलाशयातील पाणी पेयजलासाठी राखीव आहे. त्यामुळे तेथून उपसा सिंचन होऊ नये किंवा अपव्यय
होईल अशाप्रकारे थेट नदीत पाणी सोडू नये. पाण्याचा कुठेही अपव्यय होता कामा नये. याची
दक्षता बाळापूर एसडीओ, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि महावितरण व
प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेयजलासाठी पाणी नदीतून पाईपलाईनद्वारे
किंवा कसे द्यायचे, याबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावा. शहरात पाण्याचा काटकसरीने वापर
होईल, यासाठी नगरपरिषद मुख्याधिका-यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी
दिले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता
चिन्मय वाकोडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा