इमाव वित्त व विकास महामंडळाची योजना एकरकमी कर्ज फेडल्यास व्याजात ५० टक्के सवलत
इमाव वित्त व विकास महामंडळाची योजना
एकरकमी कर्ज फेडल्यास व्याजात ५० टक्के सवलत
अकोला, दि. २९ : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालयामार्फत थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे.
थकीत कर्ज प्रकरणात ज्या लाभार्थ्यांना संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करायचा आहे, अशा लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
या विशेष 'एकरकमी कर्ज परतावा' योजनेचा लाभ लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत घेता येणार आहे.
महामंडळाच्या सर्व थकबाकीदार लाभार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा आणि सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे जाहीर आवाहन जिल्हा व्यवस्थापक, अकोला यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा