सर्व व्हेईकल वॉशिंग सेंटर्स' तातडीने बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सर्व व्हेईकल वॉशिंग सेंटर्स' तातडीने बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला, दि. २३ : अकोला महानगरपालिका क्षेत्रात वाहने धुण्यासाठी सुरू असलेले सर्व वॉशिंग सेंटर्स टंचाई कालावधी संपेपर्यंत तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासू नये, तसेच मानवी जीवन आणि पशुधनासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ आणि महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ मधील तरतुदींनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश २२ ऑक्टोबर २०२६ पासून लागू केले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अकोला महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि महावितरण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा