जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सेवा संकल्प अभियान : ज्येष्ठांचा गौरव व आरोग्य तपासणी सुविधा
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
सेवा संकल्प अभियान : ज्येष्ठांचा गौरव व आरोग्य तपासणी
सुविधा
अकोला, दि. १ ; जागतिक ज्येष्ठ
नागरिक दिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून सहायक
आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात कार्यक्रम
झाला. ज्येष्ठ नागरिकांचा गौरव व आरोग्य सुविधांसाठी शिबिर यावेळी घेण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य या कार्यक्रमात
सहभागी होते. साहित्यिक अनंत खेळकर कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे होते. सहायक आयुक्त मारूती वाठ यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा गौरव झाला. आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित
शिबिरात ज्येष्ठांना नेत्रचिकीत्सा, शुगर, बी.पी.
तपासणी, तसेच एक्सरे मशीनद्वारे तपासणी आदी सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आल्या. सर्वांच्या उपस्थितीत अल्पोपहाराचा कार्यक्रमही
झाले. या उपक्रमाला सुमारे 250 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
०००



.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा