यंदा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ पातूरमध्ये ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, परिसंवाद आणि कवीसंमेलन

यंदा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ पातूरमध्ये ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, परिसंवाद आणि कवीसंमेलन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या अध्यक्षतेत उद्घाटन अकोला, दि. 8 : अकोल्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपूर्ण ठरलेला ‘अकोला जिल्हा ग्रंथोत्सव’ यंदा पातूरमधील डॉ. एच.एन. सिन्हा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. 12 व 13 ऑक्टोबरला होणार आहे. त्यात ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, परिसंवाद, कवीसंमेलन व वाचन संस्कृतीला चालना देणा-या उपक्रमांची रेलचेल असेल. मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 12 ऑक्टोबरला रोजी सकाळी 10 वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा प्रारंभ होईल. पातूर येथील श्री सिदाजी महाराज मंदीर पातूर ते कार्यक्रमस्थळ असा ग्रंथदिंडीचा मार्ग राहणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले अध्यक्षस्थानी असतील. पहिल्या दिवशी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावरील व्याख्यान, अडम धडम हा विनोदी कार्यक्रम, ‘डळमळणारी शेतीव्यवस्था’, ‘व्यसनमुक्तीसाठी युवकांची भूमिका’ या विषयावरील व्याख्याने होतील. दुसऱ्या दिवशी दि. 13 ऑक्टोबर रोजी ‘ग्रंथालय व समृद्ध वाचन चळवळ’ या विषयावरील परिसंवाद, ‘सार्वजनिक ग्रंथालयांचे आधुनिकीकरण’ या विषयावरील चर्चासत्र, ‘ग्रंथ हेच खरे मार्गदर्शक’ या विषयावरील व्याख्याने होणार आहेत. त्यानंतर कवीसंमेलन होणार असून, प्रसिद्ध कवी आपल्या कविता सादर करतील. प्रसिद्ध कवी गोपाळ मापारी हे कवीसंमेलनाचे निवेदन करतील. समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीचा नागरिक, विद्यार्थी, वाचक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून ग्रंथोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीतर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ.अतुल वानखडे यांनी केले आहे. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा