पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना उपाययोजना तातडीने पूर्ण करा जिल्हाधिकारी वर्षा मीना
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना
उपाययोजना तातडीने पूर्ण करा
जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. ६ : दुष्काळाच्या
पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर आज जिल्हाधिकारी
कार्यालयात चर्चा झाली. जिल्ह्यात आवश्यक त्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी
तातडीने कामे पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी
वर्षा मीना यांनी दिले.
पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी सर्व
यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपवनसंरक्षक सुमंत
सोळंके आदी उपस्थित होते.
वाण धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना वगळता
इतरत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यानुसार शहरी भागात, तसेच ग्रामीण भागात उपाययोजना डिसेंबरपूर्वी पूर्णत्वास न्याव्यात.
नागरिकांची गैरसोय होता कामा नये. आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने द्यावेत.
तत्काळ आवश्यक मान्यता व निधी उपलब्ध करून
देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली.
पंचनामे पूर्णत्वास
कृषी नुकसान पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्णत्वास गेली
असून,
उद्या शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. दुष्काळाच्या अनुषंगाने
काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोर पालन होईल, याची
दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
वैरण विकास कार्यक्रमाबरोबरच रब्बी हंगामात चारापिकांचे
प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत जेणेकरून उन्हाळ्यात चारा उपलब्धता राहील.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा.
नाला खोलीकरण, रूंदीकरण, बंधारे आदी
जलसंधारण कामांना वेग द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
०००


.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा