सेवा संकल्प अभियान बार्शिटाकळीत महसूल लोकअदालत अभियान
अकोला, दि. १२ : सेवा संकल्प अभियानात बार्शिटाकळी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि. १४ ऑक्टोबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्या होणार असून, संबंधित वादी, प्रतिवादी नागरिकांनी आवश्यक दस्तऐवजांसह उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. मिलिंद जगदाळे यांनी केले आहे. त्यानंतर १६ डिसेंबरलाही लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागातर्फे पाणी बचत प्रतिज्ञा
सेवा संकल्प अभियानात आरोग्य विभागातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात अधिकारी व कर्मचा-यांनी श्री शारदोत्सवाचे निमित्त साधून पाणी बचतीची प्रतिज्ञा घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांनी शपथ घेतली. यावेळी पाणी बचतीचे महत्व समजावून सांगण्यात आले.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा