जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत चर्चा पार्किंग स्थळे निश्चित करण्यासाठी संयुक्त पाहणी करणार
जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा
समितीच्या बैठकीत चर्चा
पार्किंग स्थळे निश्चित करण्यासाठी
संयुक्त पाहणी करणार
अकोला, दि. २२ : शहरातील पार्किंगच्या
समस्येवर मात करण्यासाठी वाहनतळांच्या जागा निश्चित होणे आवश्यक आहे. महापालिका, वाहतूक
पोलीस व परिवहन विभागाने संयुक्त पाहणी करावी जेणेकरून उपलब्ध जागांमध्ये वाहनतळ निर्माण
होऊ शकतील, असे निर्देश जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत आज देण्यात आले.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या
अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीला पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील
लहाने, अति. जिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार,
सा. बां. कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, निमंत्रित सदस्य प्रदीप गुरूखुद्दे व इतर
अधिकारी उपस्थित होते.
मुख्य रस्त्यांलगत वाहने उभी करण्यासाठी
जागा नसल्याने वाहतुकीत अडथळे येतात. त्यामुळे
पार्किंग स्लॉटसाठी कुठल्या जागा उपलब्ध होऊ शकतात हे शोधणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने
वाहतूक पोलीस, परिवहन व पालिकेतर्फे संयुक्त पाहणी करावी व तसा अहवाल सादर करावा. शहरातील
वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
महापालिकेतर्फे शहरातील २९ मुख्य
रस्ते ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार तेथील अतिक्रमणे काढण्याची
कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. जुन्या आरटीओ रस्त्यावर
गतिरोधक बसविणे, रतनलाल प्लॉट चौकातील रॅम्प उतार कमी करणे आदींबाबत कार्यवाहीचे निर्देश
देण्यात आले.
धर्मवीर आनंद दिघे ट्रॅफिक
पार्क निर्माण करणार
राज्य शासनाच्या निर्देशानुसार
शहरात धर्मवीर आनंद दिघे ट्रॅफिक पार्क निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. लहान मुले आणि सामान्य नागरिकांना
प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देणे आणि पर्यावरण जनजागृतीचा उद्देश असल्याचे श्री. भुयार यांनी सांगितले. पार्कच्या
अनुषंगाने जागेचा प्रस्ताव देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
अकोला पोलीसांनी
मॉडिफाईड सायलेंसरविरुद्ध धडक
कारवाई राबवून शहरातील
ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्याबद्दल पोलीस अधिक्षक श्री. चांडक
यांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शहरात अपघात टाळण्यासाठी महत्वाच्या अपघात प्रवणस्थळी
‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) बसविणे, निमवाडी उड्डाण पूलावर व शहरात इतरत्र सुरक्षिततेसाठी
आवश्यक उपाययोजना यावेळी चर्चा झाली.
०००

.jpeg)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा