महा उपलब्ध ॲप बाबत कोषागारातर्फे आज कार्यशाळा

 महा उपलब्ध ॲप बाबत कोषागारातर्फे आज कार्यशाळा


अकोला, दि. ५ :जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी उद्या एक महत्त्वाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
अकोला जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने  महा-उपलब्धी मोबाईल ॲप संदर्भात ही कार्यशाळा घेतली जात आहे. निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या ॲपच्या विविध सुविधांची माहिती आणि वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाईल.

ही कार्यशाळा उद्या मंगळवार, ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता काटेपूर्णा हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे होईल.

अकोल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी माधव ब. झुंजारे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा