उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींनी अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडावे; अन्यथा शिधापत्रिका होणार कायमची रद्द

उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींनी अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडावे; अन्यथा शिधापत्रिका होणार कायमची रद्द अकोला, दि. १३ : उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडावे जेणेकरून अधिकाधिक गरजूंना योजनेचा लाभ देता येईल. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती असा लाभ घेत असल्याचे आढळल्यास शिधापत्रिका कायमची रद्द करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिला आहे. नागरिकांना अन्न व पोषण सुरक्षा पुरविण्याकिरता रास्त दरात पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 लागू करण्यात आला आहे. राज्यात दि.1 फेब्रुवारी, 2014 पासून सदर अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. रेशनकार्ड सोबत आरसीएमएस पोर्टलमध्ये प्रत्येक शिधापत्रिकेमधील प्रत्येक लाभार्थ्यांचे आधारकार्ड संलग्न करण्यात येत असून, संगणकीरण प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आले आहे. धान्याचा लाभ गोर-गरीब, गरजू पात्र लाभार्थ्यांना दरमहा .धान्याचा लाभ मिळावा, धान्य न मिळाल्याने कोणत्याही नागरीकांचा भूकबळी होऊ नये, पात्र लाभार्थ्यांना मिळत असलेल्या धान्याचे कोणतेही गैरप्रकार होऊ नये याकरिता जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकांचे ऑनलाईन काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना-2013 अंतर्गत या जिल्ह्यामध्ये पात्र अंत्योदय शिधापत्रिका कुटुंब आणि पात्र लाभार्थी पीएचएच रेशनकार्ड लाभार्थी यांना दरमहा प्रत्येक गावातील स्वस्त रास्तभाव दुकानांमार्फत ई-पॉस मशिनमध्ये बोटाचे ठसे अद्ययावत करूनच धान्याचे वितरण/वाटप मोफत होत आहे. जिल्ह्यात उच्च उत्पन्न गटात येणारे शिधापत्रिकाधारक रेशनचा लाभ घेत आहेत. उच्च उत्पन्न गटात येत असूनही काही नागरीक अपात्र असूनही रेशनकार्डधारक धान्य योजनेचा लाभ घेत आहेत, अशा सर्व रेशन घेणा-या नागरीकांनी स्वत:हून अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडावे. आपले जवळ असलेले धान्याचे रेशनकार्ड एनपीएच, श्वेत योजनेमध्ये वर्ग करण्याकरीता आपल्याच तालुक्याचे पुरवठा विभागामध्ये जाऊन, धान्य योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज भरून द्यावे. यामुळे गोर-गरीब, मजूर, पात्र लाभार्थी यांना धान्याचा लाभ देता येईल. "अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडा" या शासनाचे योजनेमध्ये उच्च उत्पन्न गटातील नागरीकांनी रेशनचे धान्य घेणे बंद करावे. जे नागरीक उच्च उत्पन्न गटात येत आहेत, तसेच ज्या नागरीकांचे उत्पन्न जास्त आहे, अशा सर्व रेशनकार्डधारक/लाभार्थी नागरीक रास्तभाव दुकानांमधून धान्य घेत असल्याचे आढळून आल्यास, किंवा त्यांची शिधापत्रिका धान्य योजनेत दिसून आल्यास, शासनाचे आदेशाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करून शासनाला कोणतेही सहकार्य करीत नसल्याचे गृहित धरून, त्यांचा शिधा मिळणे बंद करण्यात येऊन कार्ड रद्द करण्यात येईल. उच्च उत्पन्न गटातील सर्व नागरीकांनी अन्न सुरक्षा योजनेतून स्वत:हून बाहेर पडावे, "अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा" योजनेचा फार्म तहसील कार्यालयामध्ये भरून द्यावा, शिधापत्रिका जमा करावे, शासन, प्रशासनास सहकार्य करावे. याव्यतिरिक्त कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा