जिल्हाधिका-यांची महान प्रकल्प पाहणी पेयजलासाठी उपलब्ध पाण्याचे परिपूर्ण नियोजन करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना






जिल्हाधिका-यांची महान प्रकल्प पाहणी

पेयजलासाठी उपलब्ध पाण्याचे परिपूर्ण नियोजन करा

-     जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. १६ : पेयजलासाठी उपलब्ध पाण्याचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी आज खांबोरा उन्नैयी बंधारा, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प व महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाला भेट दिली व उपलब्ध पाणी, पुरवठ्याची स्थिती आदींची माहिती घेतली.

उपलब्ध पाण्याचा पेयजलाच्या दृष्टीने पूरेपूर वापर होण्यासाठी अचूक नियोजन करावे. पाण्याचा अपव्यय कुठेही होता कामा नये. कुठेही पाणीगळती होऊ नये. पाण्याची बचत, नियोजन व सुयोग्य वापरावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. उपसा बंदीबाबत यापूर्वी निर्गमित आदेशांचे काटेकोर पालन करावे. नियमभंग होत असल्यास कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले.

यावेळी ६४ खेडी पाणीपुरवठा योजना, मूर्तिजापूर शहर पाणीपुरवठा योजना, अकोला शहर पाणीपुरवठा आदी विविध बाबींची चर्चा करण्यात आली. उन्नैयी बंधा-यातील गाळ काढल्यास त्यात पुढील काळात पाणीसाठा क्षमता वाढणार आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा