विशेष संक्षिप्त पुनरीक्षण सुधारित वेळापत्रकानुसार मतदार यादी दुरुस्ती व नाव नोंदणीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
सुधारित वेळापत्रकानुसार मतदार यादी दुरुस्ती
व नाव नोंदणीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत
निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर
अकोला, दि. १२ : महाराष्ट्रातील नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे किंवा मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदार बांधवांनी वेळेत नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज १२ ऑक्टोबर रोजी हे सुधारित वेळापत्रक अधिसूचित केले आहे.
यापूर्वी हरकती व दावे सादर करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंतच होती, ती आता वाढवून २६ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
दावे आणि हरकती सादर करण्याचा सुधारित कालावधी २६ ऑक्टोबरपर्यंत, प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी १० नोव्हेंबरपर्यंत व अंतिम मतदार यादी प्रसिद्धी १६ नोव्हेंबर रोजी होईल.
मुदतवाढीमुळे नवीन पात्र मतदारांना आपले नाव नोंदवण्यासाठी आणि मतदारांना आपल्या नावातील दुरुस्त्या करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी वेळेत नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा