दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावे- जिल्हाधिकारी वर्षा मीना ; प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक ; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून उत्सव साजरा करावा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावे- जिल्हाधिकारी वर्षा मीना प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून उत्सव साजरा करावा अकोला, दि 10 : जिल्‍ह्यातील सातही तालुक्यात दुष्काळाचे सावट असून पाणी, चारा टंचाईचे संकट ओढावलेले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी दिवसांत येणाऱ्या नवदुर्गा उत्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी सण-उत्सव साजरे करताना शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने उपक्रम राबवावे. मिरवणूक व मंडळाच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत निधीचे संकलन, पाण्याची बचत, पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन, ग्रामीण भागातील पारंपारिक वाद्यांचा उपयोग आदी उपाययोजनांबाबत व्यापक जनजागृती करुन साध्या पध्दतीने सण उत्सव साजरा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केले. नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आगामी सण उत्सवात कायदा व सुव्यस्था संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे तसेच विविध सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीत प्रारंभी विविध नवदुर्गा मंडळाच्या सदस्यांनी दुर्गा स्थापना, मिरवणूक मार्ग, गरबा स्थळी प्रशासनाकडून आवश्यक सुवीधा पुरविण्याबाबत मागण्या मांडण्यात आल्यात. तसेच बौध्द संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धम्मचक्र प्रर्वतन दिनानिमित्त आयोजित मिरवणूक व सभास्थळी विविध सोयीसुवीधा पुरविण्याबाबत सूचना मांडल्यात. नवरात्री उत्सवाचे अष्टमी व नवमी या दोन दिवस ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे, अकोला जिल्ह्याला सण उत्सवाची वैभवशाली परंपरा आहे. ती अबाधित रहावी प्रशासनाच्या वतीने परवानग्यांसाठी एक खिडकी कार्यान्वित करून आवश्यक परवानगी देण्यात याव्यात, विसर्जन घाटावर आवश्यक सुविधा पूरवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी दिले. शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मनपाच्या वतीने एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रस्त्यातील खड्ड्यांची डागडूजी तसेच पुरेशी लाईट व्यवस्था मनपा प्रशासनाव्दारे करण्यात येणार. दुर्गादेवी विसर्जनासाठी सुध्दा आवश्यक सुवीधा करण्यात येणार, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. लहाने यांनी यावेळी दिली. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज असून मंडळाच्या ठीकाणी तसेच गरबा स्थळी युवती व महिलांच्या सुरक्षेसाठी दामीनी पथक व दत्तक अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येणार. तसेच ग्रामीण स्तरावर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस स्टेशन अंतर्गत योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. कुठलाही अनु चि त प्रकार घडल्यास किंवा काही आढळल्यास पोलीस वि भागाच्या 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, बचाव पथक तत्काळ त्याठीकाणी पोहोचणार. उत्सव काळात ध्वनिप्रदुषण होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे. सण उत्सव काळामध्ये पोलीस विभागाच्या वतीने गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री. चांडक यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित नवदुर्गा उत्सव मंडळ, गरबा समिति पदाधिकारी यांनी विविध मुद्दे मांडलेत. 00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा