दुष्काळी परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग

 

दुष्काळी परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग

 

अकोला, दि. ३० : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वत: माझोड येथे शेतात पीक कापणी प्रयोगाला उपस्थिती लावली.

माझोड येथील शेतकरी कोकिळा संजीव बागेवार यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या पीक कापणी प्रयोग झाला. सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिका-यांच्या क्षेत्रभेटीमुळे पीक कापणी प्रयोगांची अचूकता, गांभीर्य व निर्धारित कार्यपद्धतीची सुयोग्य अंमलबजावणी भर देण्यात आला.

पिकांची उत्पादकता अचूकपणे निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोग जिल्ह्यात जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या मार्गदर्शनात विविध महसूल मंडळांत होत आहेत. यावेळी जिल्हाधिका-यांनी  शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना अधिकाधिक मदत मिळण्यासाठी अचूक नोंद घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तहसीलदार कुणाल झाल्टे, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुषार जाधव, तलाठी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तांदळी व बाभुळगाव येथे भेट

पीक पाहणी प्रयोगानंतर तांदळी खुर्द व बाभूळगाव येथे भेटी देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आदी विविध ठिकाणी भेटी दिल्या. शाळेत जाऊन जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व अध्ययनाची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिका-यांनी अभ्यासातील संबंधित भागाचे अध्यापनही केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा