श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानची शेतजमीन १वर्षासाठी लागवडीसाठी देणार; जाहीर लिलाव
श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानची शेतजमीन
१वर्षासाठी लागवडीसाठी देणार; जाहीर लिलाव
अकोला, दि. ८ : तेल्हारा तालुक्यातील
पाथर्डी येथील श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानच्या सुमारे पावणेतीन हेक्टर शेतजमीन
एक वर्षासाठी लागवडीसाठी देण्यासाठी जाहीर लिलाव सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या
देखरेखीत दि. १५ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वा. संस्थानच्या कार्यालयात होणार आहे. इच्छूकांनी
उपस्थित राहून सहभागी होण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार लिलावाची कार्यवाही संस्थानचे
प्रशासक तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक यांच्या देखरेखीत होईल. गट
क्र. १९ मधील ०.२९ हेक्टर आर व गट क्र. २२६ मधील २ हेक्टर ६३ आर. या शेतजमीनीचा जशी
आहे त्या स्थितीत लिलाव होईल. जमिनीचा वापर कृषी उद्देशासाठीच व्हावा. एक वर्षासाठी
लिलाव होईल. बोली लावण्यासाठी पाथर्डी येथील सेंट्रल बँकेत ५०० रू. सहभाग शुल्क भरणे
आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा