स्वच्छता, आरोग्य शिबिर आणि लोककल्याणकारी उपक्रमांवर दिला भर

पातूर न.प.तर्फे 'सेवा संकल्प अभियान' अहवाल सादर; स्वच्छता, आरोग्य शिबिर आणि लोककल्याणकारी उपक्रमांवर दिला भर पातूर, दि. १३ : पातूर नगर परिषद क्षेत्रात 'सेवा संकल्प अभियान' अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून, गत पंधरवड्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आणि विशेष मोहिमा घेण्यात आल्या. पातूर शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात अभियानाचे औचित्य साधून संपूर्ण शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पातूर शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि नाल्यांची सफाई प्राधान्य क्रमाने करून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. २५ सप्टेंबर रोजी शहरात 'स्वच्छता ही सेवा' या सूत्राखाली नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. याच दिवशी पात्र लाभार्थ्यांना 'आयुष्मान भारत कार्ड'चे वाटप करण्यात आले, तसेच शहरातील कचरा वेचकांसाठी 'नमस्ते योजना' अंतर्गत विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी १ ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच शहरातील ऐतिहासिक व महत्त्वाचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुतळा परिसराची सखोल साफसफाई करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांच्या यशोगाथांची प्रसिद्धी आणि सार्वजनिक ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. शहरातील महिला बचत गटांसाठी ९ ऑक्टोबरला विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात गोळा करणे आणि त्याचे वर्गीकरण कसे करावे, याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. पातूर नगर परिषदेद्वारे राबविण्यात येत असलेल्या या सर्व उपक्रमांमुळे नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि जनकल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत वेळेत पोहोचण्यास मोठी मदत होत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. #सेवासंकल्पअभियान_अकोला ००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा