श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानची शेतजमीन एक वर्षासाठी लागवडीसाठी देणार ; 15 ऑक्टोबरला जाहीर लिलाव
श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानची शेतजमीन एक वर्षासाठी लागवडीसाठी देणार ;
15 ऑक्टोबरला जाहीर लिलाव
अकोला, दि. 12 : तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील श्री धर्मशाळा व धर्माळ संस्थानच्या सुमारे पावणेतीन हेक्टर शेतजमीन एक वर्षासाठी लागवडीसाठी देण्यासाठी जाहीर लिलाव सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या देखरेखीत दि. 15 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वा. संस्थानच्या कार्यालयात होणार आहे. इच्छूकांनी उपस्थित राहून सहभागी होण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या प्रशासक तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरीक्षक श्रीमती शुभांगी भोपळे यांचेव्दारे करण्यात आले आहे.
सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार लिलावाची कार्यवाही संस्थानचे प्रशासक तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक यांच्या देखरेखीत होईल. गट क्र. 19 मधील 0.29 हेक्टर आर व गट क्र.226 मधील 2 हेक्टर 63 आर. या शेतजमीनीचा जशी आहे त्या स्थितीत लिलाव होईल. जमिनीचा वापर कृषी उद्देशासाठीच व्हावा. एक वर्षासाठी लिलाव होईल. बोली लावण्यासाठी पाथर्डी येथील सेंट्रल बँकेत 500 रू. सहभाग शुल्क भरणे आवश्यक आहे.
जाहीर लिलावात बोली बोलण्यासाठी प्रत्येक इच्छुक व्यक्तीला ५०० रुपये सहभाग शुल्क न्यासाच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी येथील खाते क्रमांक ३५४५३२६२३८ मध्ये जमा करावे लागेल. लिलावाच्या दिवशी पावती सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा बोली बोलता येणार नाही.
सर्वोच्च बोली लावणाऱ्या व्यक्तीला ही जमीन ३१ मार्च २०२७ पर्यंत लागवडीसाठी दिली जाईल. बोलीची २५ टक्के रक्कम त्वरित भरावी लागेल व उर्वरित रक्कम ८ दिवसांच्या आत संस्थानच्या बँक खात्यात जमा करावी लागेल.
जमिनीचा वापर केवळ कृषी उद्देशासाठीच करता येईल. तसेच शासनाकडून मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान किंवा विमा संस्थानच्या नावे जमा होईल, ज्यावर बोलीधारकाचा कोणताही हक्क राहणार नाही. इच्छुक व शेतकरी बंधूंनी ठरिते वेळी व स्थळी उपस्थित राहून या जाहीर लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा