दुष्काळीस्थितीच्या पार्श्वभूमीवरसक्तीचीकर्जवसुली थांबवाजिल्हाधिका-यांचेनिर्देश

 

दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर

सक्तीची कर्जवसुली थांबवा

जिल्हाधिका-यांचे निर्देश

अकोला, दि. २६ :मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांनी दुष्काळ किंवा कठीण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. जिल्ह्यात असे घडता कामा नये यासाठी उपनिबंधक, तसेच तहसील यंत्रणेने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत.

 

शासनाने दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत. त्यात अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. पीक कर्जाच्या पुनर्गठनाबरोबरच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स वित्तीय संस्थांकडून सक्तीच्या कर्जवसुलीबाबत शेतक-यांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा बाबींची तत्काळ दखल घेऊन त्याबाबत चौकशी व आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपनिबंधक, सहकारी संस्था, तसेच सहायक निबंधक सहकारी संस्था यांना आदेश देण्यात आले आहेत.   

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा