सेवा संकल्प अभियानात आरोग्य शिबिरांची मालिका
सेवा संकल्प अभियानात आरोग्य शिबिरांची मालिका
अकोला, दि. १४ : सेवा संकल्प अभियानात जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे
घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक
आरोग्य केंद्रांबरोबरच इतर खासगी दवाखान्यांचा सहभाग मिळवून मोठ्या प्रमाणावर आरोग्य
शिबिरे होत आहेत.
पातूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात ' सेवा संकल्प अभियान ' अंतर्गत तपासणी
शिबीर घेण्यात आले. या मध्ये गरोदर माता, स्तनदा माता, 0-6 वर्षांची बालके
यांची तपासणी करून लसीकरण करण्यात आले. तसेच आजारावर उपचार करण्यात आला. 30
वर्षावरील लाभार्थ्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या व आवश्यक तिथे उपचारही
सुरू करण्यात आले. मूर्तिजापूर, बाळापूर, अकोला, अकोट, बार्शिटाकळी, तेल्हारा तालुक्याही
सातत्याने आरोग्य शिबिरे होत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा