नोटीसप्राप्त मतदारांनी कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी निवडणूक कार्यालयाचे आवाहन
नोटीसप्राप्त मतदारांनी कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी
निवडणूक कार्यालयाचे आवाहन
अकोला, दि. २९ : ज्या मतदारांची नोटीसांबाबतची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे, अशा मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांचा नावांची जुळवणी संबंधित मतदारांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मागील एसआयआर नोंदींशी झालेली नाही, तसेच जुळवणी करूनही तार्किक विसंगती आलेली आहे अशा मतदारांना नोटीसा देऊन त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन अशी प्रकरणे संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत निकाली काढण्यात येत आहेत.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार सदर कामकाजाचा कालावधी दिनांक 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. तथापि, कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ज्या मतदारांच्या नोटीसांबाबतची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे, अशा मतदारांच्या जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी यांनी पीडीएफ स्वरूपातील उपलब्ध करून दिलेल्या याद्या अकोला जिल्ह्याचे संकेतस्थळ akola.gov.in या संकेतस्थळावर, विशेष सखोल पुनरिक्षण ज्या मतदारांबाबतच्या नोटीसा निकाली काढणे प्रलंबित आहे, त्यांची यादी/ लिस्ट ऑफ इलेक्टर्स फॉर हूम नोटिसेस आर पेडिंग फॉर डिस्पोझल या शीर्षकाखाली विधानसभा मतदारसंघ निहाय अवलोकनार्थ उपलब्ध आहेत.
वरील याद्यांचे सर्व संबंधितांनी अवलोकन करून नोटीसांबाबतची कार्यवाही प्रलंबित असलेल्या मतदारांची कागदपत्रे संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा