नवदुर्गा उत्सव, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नियोजनभवनात शुक्रवारी बैठक

 

नवदुर्गा उत्सव, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर

नियोजनभवनात शुक्रवारी बैठक

अकोला, दि. ८ : जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात साजरा करण्यात येणारा नवदुर्गा उत्सव, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी सणांच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वा. नियोजनभवनात होईल.

जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासह सुविधांच्या अनुषंगाने चर्चा या बैठकीत होईल.  नवदुर्गा उत्सव व विसर्जन तयारीचा, विविध परवानग्या सुलभतेने मिळण्यासाठी 'एक खिडकी व्यवस्था' निर्माण करणे, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व प्रशासकीय स्तरावर करावयाची आवश्यक कार्यवाही, विसर्जन आणि मिरवणूक मार्गांची दुरूस्ती व तेथील पायाभूत सुविधा, वीजपुरवठा आदी विविध विषयांवर चर्चा व निर्णय होतील. 

प्रशासकीय यंत्रणेबरोबरच संबंधित विविध उत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य बैठकीत उपस्थित राहतील.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा