बार्शीटाकळीतमहाराजस्व समाधान शिबिर३०० हूनअधिक लाभार्थींना थेट शासकीय योजनांचा लाभ
बार्शीटाकळीत
महाराजस्व समाधान शिबिर
३०० हून
अधिक लाभार्थींना थेट शासकीय योजनांचा लाभ
अकोला, दि. १९ : ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत श्री खोलेश्वर संस्थान, बार्शीटाकळी येथे ‘महाराजस्व
समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरात तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांनी
एकत्र येत एकाच छताखाली नागरिकांना विविध शासकीय दाखले व योजनांचा थेट लाभ दिला.
शिबिरात
६० नागरिकांना सातबारा उतारे, २५ शेतकर्यांना फार्मर आयडी, ४३ महिला शेतकर्यांना प्रमाणपत्रे, २३ उत्पन्न दाखले, १७ जात प्रमाणपत्रे, १९ एनसीएमसी कार्ड आणि १७
आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य, पुरवठा, सेतू, भूमी अभिलेख व कृषी विभागामार्फत
मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आले.
या
शिबिरास उपविभागीय अधिकारी मिलिंद जगदाळे, तहसीलदार रवींद्र कापशीकर, नायब तहसीलदार अतुल सोनवणे, अक्षय नागे, तालुका कृषी अधिकारी संध्या करवा
आणि मुख्याधिकारी राहुल कंकाळ उपस्थित होते. एकाच ठिकाणी सर्व कामे झाल्याने
नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
#सेवासंकल्पअभियान_अकोला


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा