अकोल्यात २७ ऑगस्टला ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार युवकांशी संवाद युवकांना कल्पना, सूचना मांडण्याची संधी माय युवा भारत केंद्राचे आवाहन
अकोल्यात २७
ऑगस्टला ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार युवकांशी संवाद
युवकांना कल्पना, सूचना मांडण्याची संधी
माय युवा भारत केंद्राचे आवाहन
अकोला, दि. २५ : राष्ट्रीय
क्रीडा दिनानिमित्त माय युवा भारत यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष
कार्यक्रमाचे आयोजन २७ ऑगस्टला शंकरलाल
खंडेलवाल महाविद्यालय येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवकांशी
आभासी माध्यमातून संवाद हे या कार्यक्रमाचे
मुख्य आकर्षण असून, युवकांना क्रीडा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर संवाद
साधण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९
ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतीक मेजर ध्यानचंद यांच्या
जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्त देशभरात युवकांचा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी
विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या
माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका
व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास तसेच युवकांच्या आकांक्षांवर
संवाद साधण्यात येणार आहे. देशभरातील १ हजार ६०० ठिकाणांहून ८ लाखांहून अधिक युवक या कार्यक्रमाशी जोडले
जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, मेरा युवा भारतचे स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात
विशेष संवादाचे आयोनजही यावेळी करण्यात आले आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्राच्या
भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना आणि
आकांक्षा मांडण्याची संधी युवकांना मिळणार
आहे.
जिल्ह्यातील युवकांनी या
कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी
आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात तसेच ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माण
प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा युवक अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा