साखरसाठ्यावरनिर्बंध; तपासणीसाठी नऊ पथके गठित

साखरसाठ्यावर निर्बंध; तपासणीसाठी नऊ पथके गठित अकोला, दि. २७ : जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत साखर साठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. साखर व्यावसायिकांना साखरेची चार हजार क्विंटल इतकी साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत संबंधित ठिकाणी तपासण्या सुरू करण्यात आल्या असून, त्यासाठी नऊ पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्हयातील सर्व नागरीकांना साखर वेळेत उपलब्ध व्हावी, साखरेच्या किंमती नियंत्रीत राहाव्यात , साखरची साठेबाजी होऊ नये यासाठी या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आल्या आहेत. केंद्रशासनाचे अधिसूचनेत नमुद केलेला साठा मर्यादा आणि इतर अटी निर्बंध आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू राहतील. जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत साखर वर साठा निर्बंध लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील साखरेचे विक्रेते व वितरक, व्यावसायीक साखरेचा साठा 4 हजार क्विंटलपर्यंतच साखर साठा निर्बंध मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याहून अधिक साठा कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत धारण करता येणार नाहीत. उत्पादनासाठी, वापरासाठी किंवा कच्चा माल म्हणून प्रति महिना 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणारा कोणताही मोठा ग्राहक 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी साखरेचा साठा ठेवणार नाही. सर्व साखर विक्रेते व वितरक यांनी अन्नसाठा देखरेख पोर्टलवर https://foodstock.dfpd.gov.in/ तात्काळ साखर व्यावसायीकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी केले. पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी न केल्यास अथवा चुकीची, अपूर्ण माहिती भरल्यास, ही बाब गंभीर अनियमितता मानली जाईल आणि दोषीं व्यावसायीक/संस्थावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम ,1955 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. या जिल्ह्यामध्ये नागरीकांना वेळेत मागणी केल्यानुसार साखरेचा सुरळीत पुरवठा, वितरण होणे आवश्यक आहे. साखर साठा निर्बंध लागू असल्याने साखर साठा मर्यादेच्या पालनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी तसेच पडताळणी करण्यासाठी जिल्हयातील सर्व कार्यक्षेत्रात पुरवठा विभाग यंत्रणेद्वारे वेळोवेळी भेटी, पडताळणी, तपासणी करणे, तसेच साखरेचा अवैधरित्या साठवणुक किंवा विक्री रोखण्याकरिता जिल्हा स्तरावर दक्षता, फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या व उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्हयामध्ये 9 तपासणी पथक गठित करण्यात आलेले आहे. तपासणी पथकामार्फत साखर साठा व्यवसाय,साठवणुक,विक्री,संस्था इ.ठिकाणांवर भेटी/ तपासणी करणे सुरू आहे. केंद्र शासनाच्या पोर्टलवर साखर व्यवसायाची नोंदणी करून साखर साठा स्टॉक नमुद पोर्टलवर अद्ययावत करावा. जे साखर व्यावसायिक शासनाने दिलेल्या निर्देशानुसार साखर साठा स्टॉक ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत, भेटी दरम्यान असे निदर्शनास आल्यास अधिनियमाअन्वये धडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी आवश्यकतेनुसारच साखर खरेदी करावी, अनावश्यक साखर साठा खरेदी करून साठवणूक करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन