जिल्हा उद्योग केंद्रप्रमुखांच्या पदनामात बदल
जिल्हा उद्योग केंद्रप्रमुखांच्या पदनामात बदल
अकोला, दि. २१: जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयप्रमुखाचे पदनाम
आता ‘महाव्यवस्थापक’ऐवजी आता ‘उपायुक्त (उद्योग व सेवा)’ असे झाले आहे.
तसा शासन निर्णय उद्योग व खनिकर्म विभागाने निर्गमित केला आहे. विभागाने
जाहीर केलेल्या सुधारित आकृतीबंधात नविन पदनामाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुषंगाने
उद्योग आयुक्तालयाने परिपत्रक काढून कार्यालयीन कामकाजात सुधारित पदनामाचा वापर करण्याच्या
सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राशी संबंधित सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार
तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये यापुढे उपायुक्त(उद्योग व सेवा) असे पदनाम वापरण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा