राज्यस्तरीय पराक्रम दिन स्पर्धांसाठी सहभागाचे आवाहन
राज्यस्तरीय पराक्रम दिन स्पर्धांसाठी सहभागाचे आवाहन
अकोला, दि. 4 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
पराक्रम दिनाच्या नियोजनासाठी अमृत संस्थेने इतिहास अभ्यासकांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. या स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. निबंध स्पर्धेत स्पर्धकांनी सुमारे १ हजार शब्दांचा निबंध अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. निबंध लेखनासाठी संकेतस्थळावरील संदर्भ पुस्तके, लिंक्स आणि माहिती पुस्तिकेचाच आधार घेणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वतःचा कमाल ७ मिनिटांचा ओरिजिनल व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ स्पष्ट आवाजाचा व उत्तम गुणवत्तेचा असावा. कोणत्याही प्रकारचे व्हिज्युअल किंवा साऊंड इफेक्ट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) निर्मित प्रतिमा अथवा तांत्रिक फेरबदल वापरण्यास परवानगी नसणार आहे. रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी असून २ ते ३ मिनिटांचे रील्स किंवा शॉर्ट्स तयार करणे अपेक्षित आहे. विषयानुरूप लोकेशन, उत्तम ध्वनी व व्हिडिओ गुणवत्ता आवश्यक असून रिल्स स्वतःच्या आवाजात व स्वतःवर चित्रीत केलेली असावीत. मूळ विषयाला पूरक ठरेल अशा मर्यादित स्वरूपात एआय, इमेज किंवा साऊंड मिक्सिंगचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्पर्धांसाठी १८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे, अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे, थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य, युद्धनीती, स्वामीनिष्ठा, दिल्ली मोहीम, बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते आणि पालखेड विजय हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धेची सविस्तर नियमावली, विषय, बक्षिसांची माहिती, संदर्भ पुस्तके, ई-बुक तसेच ऑनलाइन नोंदणीची सुविधा https://parakramdin.mahaamrut. org.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पराक्रम दिनाच्या नियोजनासाठी अमृत संस्थेने इतिहास अभ्यासकांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. या स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. निबंध स्पर्धेत स्पर्धकांनी सुमारे १ हजार शब्दांचा निबंध अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. निबंध लेखनासाठी संकेतस्थळावरील संदर्भ पुस्तके, लिंक्स आणि माहिती पुस्तिकेचाच आधार घेणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वतःचा कमाल ७ मिनिटांचा ओरिजिनल व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ स्पष्ट आवाजाचा व उत्तम गुणवत्तेचा असावा. कोणत्याही प्रकारचे व्हिज्युअल किंवा साऊंड इफेक्ट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) निर्मित प्रतिमा अथवा तांत्रिक फेरबदल वापरण्यास परवानगी नसणार आहे. रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी असून २ ते ३ मिनिटांचे रील्स किंवा शॉर्ट्स तयार करणे अपेक्षित आहे. विषयानुरूप लोकेशन, उत्तम ध्वनी व व्हिडिओ गुणवत्ता आवश्यक असून रिल्स स्वतःच्या आवाजात व स्वतःवर चित्रीत केलेली असावीत. मूळ विषयाला पूरक ठरेल अशा मर्यादित स्वरूपात एआय, इमेज किंवा साऊंड मिक्सिंगचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्पर्धांसाठी १८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे, अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे, थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य, युद्धनीती, स्वामीनिष्ठा, दिल्ली मोहीम, बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते आणि पालखेड विजय हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धेची सविस्तर नियमावली, विषय, बक्षिसांची माहिती, संदर्भ पुस्तके, ई-बुक तसेच ऑनलाइन नोंदणीची सुविधा https://parakramdin.mahaamrut.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा