नशामुक्त भारत अभियानाच्या वर्धापन दिनानिमित्त १८ ऑगस्टला ई-प्रतिज्ञा अभियान विद्यार्थी, युवा, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नशामुक्त भारत अभियानाच्या वर्धापन दिनानिमित्त १८ ऑगस्टला ई-प्रतिज्ञा अभियान विद्यार्थी, युवा, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन 
    अकोला, दि. ६ : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागामार्फत अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १८ ऑगस्ट २०२६ रोजी 'नॅशनल प्लेज अगेंस्ट ड्रग ॲब्यूज' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील किमान १० टक्के लोकसंख्येचा या उपक्रमात सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, खाजगी संस्था तसेच सार्वजनिक संस्थांमध्ये ई-प्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी, युवा, महिला, शासकीय कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी नशामुक्त भारत अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली ई-प्रतिज्ञा घेऊन त्याचे सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-प्रतिज्ञा घेण्यासाठी नागरिकांनी https://nmba.dosje.gov.in/pledge?type=e-pledge या संकेतस्थळाला भेट द्यावी. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवा, महिला, शासकीय कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक तसेच व्यसनमुक्ती केंद्रांनी ऑनलाइन पोर्टलद्वारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अकोला येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा