शासकीय आयटीआय अकोला येथे आर्किटेक्चर ड्राफ्टसमन व्यवसायाला नव्याने मान्यता.
शासकीय आयटीआय अकोला येथे
आर्किटेक्चर ड्राफ्टसमन व्यवसायाला नव्याने मान्यता.
अकोला, दि. ११ : सम्राट चंद्रगुप्त मौर्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे नव्याने संलग्नता प्राप्त झाल्याने आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन या व्यवसायाला आणखी २४ जागांची उपलब्धता झालेली आहे.
खूप मागणी असलेल्या या व्यवसायाला दिनांक १२ ऑगस्ट रोजी पासून सुरु होणाऱ्या पहिल्या समुपदेशन फेरी व इतर फेरीत इच्छुक उमेदवारांनी प्राधान्याने प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंके यांनी केले आहे.
संस्थेचे प्रवेश प्रमुख विनोद पायघन यांनी दिलेल्या माहितीनुसार समुपदेशनाची पहिली फेरी ही १२ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता पासून सुरू होणार आहे. या समुपदेशन फेरीमध्ये जर पूर्ण प्रवेश न झाल्यास आणखी पुढे समुपदेशन फेऱ्या ह्या होणार आहेत.तरी त्याकरता फेरीच्या आधी ऑनलाईन हजेरी दाखल करून समुपदेशन फेरीला हजर रहावे अशी माहिती दिली.
पुढील फेरी करिता रिक्त जागा आणि समुपदेशन फेरी याबद्दलच्या अधिक माहिती करता संस्थेशी संपर्क साधावा किंवा admission.dvet.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी असे संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख अरविंद पोहरकर यांनी सांगितले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा