अकोल्यात ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा युवकांशी संवाद युवकांचा मोठा प्रतिसाद
अकोल्यात ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा युवकांशी संवाद
युवकांचा मोठा प्रतिसाद
अकोला, दि. २७ : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माय
युवा भारत केंद्राच्या वतीने अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल
महाविद्यालय येथे‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रम हजारो
विद्यार्थांच्या उपस्थितीत झाला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी
माध्यमातून संवाद साधत तरूणांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून या संवादात्मक
कार्यक्रमाचे आयोजन माय युवा भारत केंद्राने केले. या माध्यमातून
युवकांना क्रीडा विकास, युवकांच्या
आकांक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी
आमदार वसंत खंडेलवाल, ताराताई हातवळणे, माय भारत युवा केंद्राचे जिल्हा युवक
अधिकारी अक्षय निपाणे, मदन घेघाटे, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी
श्रीनिधी वाजपेयी,शंकरलाल
खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगदीश साबू, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त हरीश टावरी, प्राचार्य
डॉ. राजेश चंद्रवंशी, डॉ.
शैलेंद्र मडावी व डॉ. सोनाली गव्हांदे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी भारताने 2036
च्या ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके मिळविण्यासाठी आजपासूनच तयारी सुरू
करण्याची गरज असल्याचे सांगितले. युवकांनी क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहून
समर्पण, शिस्त, मेहनत आणि
दीर्घकालीन दृष्टिकोनातून तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी ‘नशामुक्त भारत’ बाबतही युवकांना
महत्त्वपूर्ण संदेश दिला. नशेपासून दूर राहून निरोगी, शिस्तबद्ध
आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या संदेशामुळे
सहभागी युवकांना क्रीडा, तंदुरुस्ती आणि निरोगी
जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमात बॉक्सिंगपटू विनोद अत्रे आणि हरिवंश टावरी
यांच्याशी विद्यार्थ्यांचा विशेष संवाद आयोजित करण्यात आला. तसेच उपस्थित
क्रीडापटूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. क्रीडापटूंनी आपल्या क्रीडा प्रवासातील
अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत यशासाठी शिस्त, समर्पण, सातत्य, मेहनत आणि तंदुरुस्तीचे महत्त्व
अधोरेखित केले.
रेवती उंबरकर – बॉक्सिंग, श्री आकाश राऊत – क्रिकेट आणि पायल गावंडे – टेबल टेनिस आदी क्रीडापटूंनी सहभाग घेतला. क्रीडापटूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या
क्रीडा प्रवासातील अनुभव सांगितले.
खेलो इंडिया संवाद हा उपक्रम देशाच्या क्रीडा विकासाचा मूलमंत्र आहे.देशाच्या
क्रीडा स्वप्नांना नवीन भरारी देणारा आहे, अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व क्रीडापटूंनी व्यक्त केल्या.
देशभरात युवकांचा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी
विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याबाबत यावेळी माहिती देण्यात
आली. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना आणि आकांक्षा मांडण्याची संधी युवकांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली.
०००
.jpeg)

%20-%20Copy.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा