अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा ; रिक्त पदे तातडीने भरा ; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा रिक्त पदे तातडीने भरा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अकोला, दि. १९ : अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक असून, योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यावर भर द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने आज येथे दिले. त्याचप्रमाणे, रिक्त पदांची भरती तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. समितीचे सदस्य आमदार सर्वश्री. जगन्नाथ अभ्यंकर, डॉ.अशोक माने, संजय मेश्राम, गजानन लवटे उपस्थित होते. समितीच्या अवर सचिव जयश्री म्हात्रे,जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर,पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, उपवनसंरक्षक (वन्यजीव) राहुल तोलिया, महाबीज महाव्यवस्थापक डॉ.संजय गरकल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. अनुसूचित जाती कल्याण योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. त्याचप्रमाणे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्पन्नातून पाच टक्के निधी मागासवर्गीयांसाठी कल्याण योजनांवर खर्च करावा. दलित वस्ती सुधार योजनांमधील कामे गुणवत्तापूर्ण व्हावी. वैयक्तिक लाभाच्या योजनाही प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश समितीने दिले. त्याचप्रमाणे, संबंधित सर्व विभागांनी रिक्त पदांची माहिती अद्ययावत करून भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. कुठेही रिक्त पदे राहता कामा नयेत, असे निर्देश समितीने दिले. यावेळी महसूल विभाग,नगरपालिका,जिल्हा परिषद, वनविभाग व विविध विभागाच्या अनुसूचित जाती कल्याणकारी योजना, कर्मचारी रिक्त पदांबाबत आढावा घेतला. शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांना नियमानुसार योग्य प्रतिनिधित्व याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. 0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन