जिल्ह्यात साखर निर्बंध साठा आदेश लागू

 

जिल्ह्यात साखर निर्बंध साठा आदेश लागू

अकोला, दि. २१ : केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तु अंतर्गत  साखर साठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यातील साखर व्यावसायिकांना साखरेची ४ हजार क्विंटल इतकी साठा मर्यादा (स्टॉक होल्डिंग‍ लिमीट) निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना साखर वेळेत उपलब्ध व्हावी,  साखरेच्या किमती नियंत्रीत राहाव्यात, साखरचे साठेबाजी हो नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. केंद्रशासनाच्या अधिसूचनेत नमुद केलेला साठा मर्यादा आणि इतर अटी निर्बंध आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू राहतील.

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूअंतर्गत साखरेच्या व्यावसायिकांना हजार क्विंटलपर्यंतचा साखर साठा करता येईल. तशी  निर्बंध मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून, संपुर्ण जिल्हयात सदरहू साखर मर्यांदा निर्बंध आदेश पुढील   आदेशापर्यंत लागू राहतील.

यासंबंधी कार्यक्षेत्रात  पुरवठा विभाग यंत्रणेद्वारे वेळोवेळी भेटीदरम्यान पडताळणी करण्यात येईल. सर्व साखर व्यापा-यांनी अन्नसाठा देखरेख पोर्टलवर https://foodstock.dfpd.gov.in/ तात्काळ नोंदणी करून साखर साठ्याची स्थिती पोर्टलवर नमूद करावी. प्रत्येक शुक्रवारी साखर स्टॉक पोझिशन अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अचूक आणि वेळेवर दिली जाईल याची  खात्री करणे आवश्यक आहे. पोर्टलवर नोंदणी अयशस्वी होणे किंवा पोर्टलवर चुकीची,अपूर्ण, उशिरामाहिती देणे ही बाब गंभीर मानली जाईल आणि अशा व्यावसायि, संस्थांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार कठोर कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिला आहे.

०००  

                                                                                                                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन