पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्याकडून म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा प्रकल्पाची पाहणी








 

 

पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्याकडून

 म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा प्रकल्पाची पाहणी

अकोला, दि. 15 :  राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाला भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची पाहणी केली.

संस्थेचे सचिव प्रा. विवेक बिडवई, संघाचे प्रांत सरकार्यवाह अजय नवघरे यांच्यासह अधिकारी व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी सप्तगौ परिक्रमा मंदिराला भेट देऊन गौपूजन केले. त्यानंतर त्यांनी गोशाळेची पाहणी केली.

तेथील धन्वंतरीभवन औषधे निर्मिती केंद्र आणि खत निर्मिती केंद्रालाही त्यांनी भेट दिली. त्याठिकाणी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन