तिरंगा मोटरसायकल रॅलीला युवकांचा मोठा प्रतिसाद
हर घर तिरंगा’ मोहिम
तिरंगा मोटरसायकल रॅलीला युवकांचा मोठा प्रतिसाद
अकोला दि. 14 : केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने "हर घर तिरंगा 2026" मोहिम राबविण्यात येत असून, आज दुपारी शहरात तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत झाला. मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, अपर पोलीस अधीक्षक सीएसके रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्यासह अनेक अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात पोलीस अधीक्षक कार्यालय येथून झाली. रॅलीमध्ये अधिकारी-कर्मचा-यांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीते आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणांनी आसमंत निनादून गेले होते. सोबत तिरंगा ध्वज घेऊन रॅली मार्गक्रमण करत होती. रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
पुढे लक्झरी बसस्थानक चौक, शासकीय बगिचा, शहर कोतवाली चौक, बियाणी चौक, अकोट स्टँड चौक,अग्रसेन चौक,दुर्गा चौक,नेकलेस रोड,सिव्हील लाईन चौक,नेहरू पार्क चौक,हुतात्मा चौक,गौरक्षण रोड,तुकाराम चौक,कोलखेड चौक, सिंधी कॅम्प,जेल चौक असा रॅलीचा मार्ग होता. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
०००

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा