वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि. 11 : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे
शासकीय वसतिगृह येथे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावच्या
विद्यार्थ्यांना रिक्त असलेल्या जागेवर विनामूल्य प्रवेश देणे सुरु आहे. इच्छूकांनी
१५ ऑगस्टपूर्वी ऑनलाईन अर्ज करून त्याची प्रत वसतिगृहाच्या कार्यालयात सादर करावी,
असे आवाहन गृहपाल के.एम.तिडके (मो.नं. 8308058833) यांनी केले आहे.
वसतिगृहात
विद्यार्थ्याना राहण्याची व्यवस्था, नाश्ता व जेवण, तसेच स्टेशनरी भत्ता, गणवेश
भत्ता, मासिक निर्वाह भत्ता, अभ्यासिका आदी सुविधा विनामूल्य मिळतात. विद्यार्थ्यांना
गुणांच्या टक्केवारीनुसार प्रवेश मिळेल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून
वसतीगृहात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले.
००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा