सामाजिक न्याय विभागाचे अर्ज भरण्यासाठी आवाहन शैक्षणीक वर्ष २०२६-२७ साठी महाडीबीटी २.० वर प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू!

 सामाजिक न्याय विभागाचे अर्ज भरण्यासाठी आवाहन

शैक्षणीक वर्ष २०२६-२७ साठी

महाडीबीटी २.० वर प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू!

 

अकोला, दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्री-मॅट्रिक (मॅट्रिकपूर्व) शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या नवीन पोर्टलवर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता अधिकृतपणे सुरू झाली आहे. राज्यभरातील सर्व पात्र विद्यार्थी, पालक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

महाडीबीटी २.० वर उपलब्ध असलेल्या प्रमुख प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना :

        भारत सरकार प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती : इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यास धोकादायक क्षेत्रातील पाल्यांसाठी शिष्यवृत्ती : इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या, तसेच पालकांचा व्यवसाय साफसफाई किंवा आरोग्यास धोकादायक क्षेत्रात असलेल्या मुलांसाठी, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना : इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी, मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती : इयत्ता ५ वी ते १० वी मधील माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे योजना : इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने आदी योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थी- विद्यार्थींनींसाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

शाळा व मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाच्या सूचना

    सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर सामाजिक कल्याण विभागाकडून मिळालेल्या अधिकृत लॉगिन (Login) द्वारे भरायचे आहेत. जर कोणत्याही शाळेला लॉगिन किंवा पासवर्डबाबत अडचण येत असल्यास, त्यांनी तात्काळ संबंधित शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.

        अर्ज भरण्यासाठी भरण्यासाठी सर्वप्रथम mahadbt2.maharastra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.  त्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस पोर्टलवर 'लॉगिन' टॅब निवडा. यामध्ये 'नागरिकांसाठी लॉगिन' किंवा 'महाआयडीशिवाय प्रवेश करा' या पर्यायाचा वापर करून संस्था/पालक लॉगिन करू शकतात. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP प्रविष्ट करून लॉगिन पूर्ण करावे. लॉगिन झाल्यानंतर पात्र योजनांची यादी दिसेल. हव्या असलेल्या योजनेच्या नावासमोरील 'पहा' बटनवर क्लिक करून सर्व अटी वाचून घ्या. त्यानंतर 'Apply' टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील (चालू व मागील वर्ष) आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट किंवा PDF भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवा. अर्ज भरताना जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र, दिव्यांगत्व आणि कौटुंबिक उत्पन्न यांसारखा सर्व तपशील काळजीपूर्वक भरावा.

अधिक माहिती किंवा तांत्रिक अडचणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या ०२२-४९१५०८०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा,  अथवा helpdesk@mahadbt.gov.in  या ई मेल आयडीवर संपर्क करावा. तांत्रीक अथवा प्रशासकीय तक्रारीसाठी आपल्या लॉगीनमधून  स्क्रीन शॉट तक्रार नोंदवि ण्याची  सुवि धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही समाज कल्याण वि भागव्दारे कळ वि ण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन