भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन; केंद्रीय विद्यालयाचा आज प्रवेशोत्सव मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रानभाजी महोत्सव व विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचाही शुभारंभ
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन; केंद्रीय विद्यालयाचा आज प्रवेशोत्सव
मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
रानभाजी महोत्सव व विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचाही शुभारंभ
अकोला, दि. १४ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उद्या दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा. होणार आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण होईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम होणार आहेत.
केंद्रीय विद्यालयात प्रवेशोत्सव
अकोला येथे केंद्रीय विद्यालयाची स्थापना झाली असून, पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या उपस्थितीत विद्यालयात उद्या प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर सकाळी १० वा. हा कार्यक्रम होईल. जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
विश्रामगृहाच्या कामांचे उद्घाटन
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण, तसेच आवारभिंतीच्या बांधकामाचा उद्घाटन समारंभ सकाळी 9.45 वा. पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘आत्मा’तर्फे रानभाजी महोत्सव
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) जिल्हा रानभाजी महोत्सव शनिवारी सकाळी 10 ते दु. 3 या वेळेत येथील मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात होणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते होईल. आरोग्यासाठी पोषक असलेल्या अनेक रानभाज्या या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा