अकोला टपाल विभागात पीएलआय/आरपीएलआय प्रत्यक्ष एजंट पदासाठी भरती 19 ऑगस्ट रोजी वॉक-इन-इंटरव्ह्यू

 अकोला टपाल विभागात पीएलआय/आरपीएलआय प्रत्यक्ष एजंट पदासाठी भरती 

19 ऑगस्ट रोजी वॉक-इन-इंटरव्ह्यू

अकोला, दि. 6 ऑगस्ट : भारतीय टपाल विभागाच्या अकोला विभागामार्फत पोस्टल लाईफ इन्शुरन्स (पीएलआय) आणि रूरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स (आरपीएलआय) व्यवसायासाठी प्रत्यक्ष एजंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष एजंट म्हणजे खुल्या बाजारातून नियुक्त करण्यात येणारा विमा प्रतिनिधी असून, पीएलआय/आरपीएलआय व्यवसाय मिळविणे तसेच जीवन विमा पॉलिसींचे सातत्य, नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन यासंदर्भातील व्यवसायासाठी त्यांना कमिशनच्या स्वरूपात मानधन मिळणार आहे.

पात्रता : अर्जदाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे व कमाल 50 वर्षे असावे. तसेच केंद्र किंवा राज्य शासन मान्यताप्राप्त मंडळातून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोण अर्ज करू शकतात? बेरोजगार व स्वयंरोजगारित युवक-युवती, माजी विमा एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, निवृत्त शिक्षक, बचत गटांचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामप्रधान तसेच टपाल विभागाने योग्य समजलेल्या इतर पात्र व्यक्ती अर्ज करू शकतात. 

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे : उमेदवारांनी अर्जासह दहावी व बारावीची गुणपत्रके, प्रमाणपत्रे, चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. मुलाखतीदरम्यान भारतातील जीवन विमा उद्योग, पीएलआय/आरपीएलआय योजना तसेच विमा विपणनासंदर्भातील प्रश्न विचारले जाणार असून, उमेदवारांची निवड मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

सुरक्षा ठेव व प्रशिक्षण : निवड झालेल्या प्रत्यक्ष एजंटला राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) किंवा किसान विकास पत्र (केव्हीपी) यांच्या स्वरूपात 5 हजार रूपयाची सुरक्षा ठेव जमा करावी लागेल. निवडीनंतर विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विभागीय प्रमुखांकडून परवाना, एजंट कोड व ओळखपत्र देण्यात येईल. नियुक्तीबाबतचे इतर नियम व अटी मुलाखतीच्या वेळी सविस्तर सांगण्यात येतील.

मुलाखतीचा तपशील :

दिनांक : 19 ऑगस्ट 2026

वेळ : सकाळी 11.00 ते दुपारी 4.00

स्थळ : प्रवर डाक अधीक्षक, अकोला विभाग यांचे कार्यालय, चौधरी हॉस्पिटलसमोर, सिव्हिल लाईन चौक, दत्त मेडिकलजवळ, अकोला – 444001.

अधिकाधिक पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन