अकोल्यात ३१ ऑगस्ट रोजी 'जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद'; उद्योजकांसाठी मोठी संधी



 

अकोल्यात ३१ ऑगस्ट रोजी 'जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद'; उद्योजकांसाठी मोठी संधी

 

अकोला, दि. २७ : उद्योग विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणुकीला गती देण्यासाठी आणि व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय 'जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे' आयोजन दि. ३१ ऑगस्ट रोजी हॉटेल आर. जी. एक्सक्लुझिव्ह येथे सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.

 

 

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या परिषदेमध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार केले जाणार आहेत.

 

 गुंतवणूक परिषदेची ठळक वैशिष्ट्ये :

 

* गुंतवणुकीला प्रोत्साहन: जिल्ह्यात नवीन व्यवसायांना आकर्षित करणे आणि चालना देणे.

* परवानग्या सुलभ करणे: उद्योगांसाठी आवश्यक परवाने व मंजुरी वेळेत मिळवून देण्यासाठी 'मैत्रीकायदा व सुविधा कक्षाबाबत मार्गदर्शन.

* तज्ज्ञांचे मार्गदर्शन: औद्योगिक सुविधा, व्यापार आणि गुंतवणूक वाढीसाठी विविध सरकारी विभागांचे प्रमुख व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त  संतोष बनसोड यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व नवउद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

* दिवस : सोमवार, ३१ ऑगस्ट

* वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत

* ठिकाण: हॉटेल आर. जी. एक्सक्लुझिव्ह, मूर्तिजापूर रस्ता, अकोला.

०००

 

 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन