माती अन् पाणी वाचवण्यासाठी तरुणाईला आवाहन: 'रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन' स्पर्धेचे आयोजन! ​"एक Reel... मातीसाठी! एक Reel... पाण्यासाठी! एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!"

 विशेष लेख 


माती अन् पाणी वाचवण्यासाठी तरुणाईला आवाहन: 'रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन' स्पर्धेचे आयोजन! 


 ​"एक Reel... मातीसाठी! एक Reel... पाण्यासाठी! एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी!" 


पर्यावरण रक्षण आणि जलसंधारणाची चळवळ आता  मर्यादित स्वरूपात राहिली नसून डिजीटल विश्वातही तितक्याच ताकदीने पोहोचणार आहे.

दि १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या ‘जलसंधारण सप्ताहा’चे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने राज्यातील तरुण-तरुणींसाठी ‘रील फॉर सोईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन’ या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय रील स्पर्धेची घोषणा केली आहे.

​आजची तरुण पिढी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. याच सर्जनशीलतेचा उपयोग करून माती व पाण्याचे महत्त्व सांगणारा संदेश घराघरांत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


​ स्पर्धेत भाग कोण घेऊ शकतं? 

​महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील सर्व युवक-युवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. राज्यभरातून १०,००० हून अधिक रील्स गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्सचा सहभाग अपेक्षित आहे.

कोणत्या विषयांवर रील बनवू शकता? 

​तुमच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी जल अन् मृद्संवर्धनाशी संबंधित अनेक विषय खुले ठेवण्यात आले आहेत.

​माती व पाणी संवर्धन आणि त्यांची बचत

​पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे (Rainwater Harvesting)

​शेततळे, बंधारे आणि पाणलोट क्षेत्राचा विकास

​वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण आणि मातीची धूप रोखणे,

​तुमच्या गावातील जलसंधारणाची यशस्वी उदाहरणे किंवा पारंपरिक पद्धती

​माती-पाणी वाचवणाऱ्या तुमच्या स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना


​ रील कशी तयार करायची?

Instagram Reel ३० ते ६० सेकंदांची असावी.

व्हिडिओच्या सुरुवातीला तुमचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगणे अनिवार्य असून 

​रील तुमच्या स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. रील पोस्ट करताना मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत अकाऊंटला टॅग करा आणि #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग आवर्जून वापरावा.


​ विजेत्यांना मिळणार आकर्षक पारितोषिके! 

​स्पर्धेतील उत्कृष्ट रील्सना तज्ज्ञ परीक्षकांद्वारे आणि सोशल मीडियावरील प्रतिसादाच्या आधारे प्रोत्साहनपर रोख बक्षिसे दिली जातील:

​प्रथम क्रमांक: ₹ २५,०००/- आणि गौरवचिन्ह

​द्वितीय क्रमांक: ₹ १५,०००/- आणि गौरवचिन्ह

​तृतीय क्रमांक: ₹ १०,०००/- आणि गौरवचिन्ह

​याशिवाय, विजेत्यांना "युवा मृद-जलदूत" हा विशेष सन्मान देण्यात येईल, तर पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल.


​परीक्षणाचे निकष

​केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता ठरवला जाणार नाही. विषयाची मांडणी (३० गुण), कल्पकता (२५ गुण), सामाजिक संदेश (२० गुण), सादरीकरणाचा दर्जा (१५ गुण) आणि प्रतिसाद (१० गुण) अशा एकूण १०० गुणांच्या आधारे निष्पक्ष पद्धतीने परीक्षण केले जाईल.

​आजच सहभाग घ्या!

​आपल्या मातीचा सुगंध आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी तुमची कल्पकता वापरा. कॅमेरा उचला, एक छानशी रील बनवा आणि या राज्यस्तरीय चळवळीचा भाग बना!



संकलन 

जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

**

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन