रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथील जप्त मुद्देमालाचा १० ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव

 रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथील जप्त मुद्देमालाचा १० ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव

अकोला, दि. ४ : रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथे विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल दीर्घकाळापासून मालखान्यात ठेवण्यात आलेला आहे. संबंधित मुद्देमालाच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, आजपर्यंत मूळ मालकांचा शोध लागलेला नसल्याने सदर मुद्देमालाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
याबाबत न्यायालय तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांच्या आदेशानुसार संबंधित मुद्देमालाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी जाहिर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथे सोबतच्या यादीतील मुद्देमालाचा जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात इच्छुक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.
--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन