रेडक्रॉसच्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आरोग्यदायी व स्त्युत्य उपक्रम -जिल्हाधिकारी
रेडक्रॉसच्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्यदायी व स्त्युत्य उपक्रम
-जिल्हाधिकारी
अकोला, दि. २१ : इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने लोकनेते,माजी मंत्री
स्व. पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य
तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित या शिबिरात
उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित
होत्या. अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित
या शिबिरात रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉ किशोर मालोकार, सचिव प्रभजीत सिंह बछेर, जिल्हा
पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे,बहुजन
पत्रकार संघाचे मार्गदर्शक अँड सुधाकर खुमकर,अध्यक्ष अनिल मोहोरे,जावेद जकारिया आदी
उपस्थित होते.
शासन व समाजाचा दुवा असणारा पत्रकार वर्ग हा खऱ्या अर्थाने आरोग्यमय
झाला पाहिजे, यासाठी सातत्याने अशा आरोग्यदायी उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी वर्षां मीना यांनी करून या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी
वर्षा मीना यांनी अकोला येथे एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या
हस्ते गौरविण्यात आले.
शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा
स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय वर्गाने उपस्थित पत्रकारांची आरोग्य तपासणी करून त्यांना
औषधोपचार वितरित करण्यात आला. शिबिरात श्री. फुंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या
शिबिराची उपयुक्तता प्रतिपादित केली.
रेडक्रॉसचे चेअरमन डॉ किशोर मालोकार यांनी यावेळी या आगळ्यावेगळ्या
व अत्यावश्यक असणाऱ्या उपक्रमाची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. व्यवस्थापन रेडक्रॉसचे
सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केले. सूत्रसंचालन कपिल रावदेव यांनी तर आभार ॲड. सुभाषसिह
ठाकूर यांनी मानले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, रेडक्रॉसचे डॉ संदीप चव्हाण,
डॉ गजानन वाघोडे, एड सुभाष मुंगी,सीए मनोज चांडक, डॉ एन के माहेश्वरी,रामहरी डांगे,प्रकाश
गवळी,राजू बुळुकले, अँड आशिष फुंडकर, अभयसिंग , रजपूत,संजय ढेपे, विजयराव
भोरे, प्रशांत लोथे नितीन मेतकर, गोकुळ पोतले, रविंद्र वानखड, मंगला डोंगरे, अनमोल
सिह बछेर समवेत वैद्यकीय वर्ग ,परिचारिका आदी उपस्थित होते.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा