द्रवनत्र पात्रांच्या वाहतुकीसाठी निविदा मागविल्या
द्रवनत्र पात्रांच्या वाहतुकीसाठी निविदा मागविल्या
अकोला, दि. २१ : जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातर्फे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांत द्रवनत्र पात्रांची वाहतूक करण्यासाठी मिनीट्रक वाहतूकधारकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
निविदांबाबतच्या नियम व अटी अर्जाचा नमुना सदर कार्यालयामार्फत शुल्क एक हजार रूपये भरून कार्यालयात उपलब्ध होईल. निविदा दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
निविदामध्ये वाहतूक दर प्रतिकिलोमीटर असा असावा. निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार निविदा समितीने राखून ठेवले आहेत. दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता निविदा समितीसमोर उघडण्यात येतील. अशी माहिती जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा