भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात

 

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन

मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात

अकोला, दि. १३ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९.०५ वा. होणार आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण होईल.

यादिवशी ८.३५ ते ९.३५ या वेळेत इतर कोणताही शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. ध्वजस्तंभाची रंगरंगोटी, परिसराची, तसेच प्रमुख मार्गांची स्वच्छता आदी कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कार्यालये, आस्थापना, प्राधिकरणांनी व इतर संस्थांनी ध्वजारोहणप्रसंगी ध्वजसंहितेचे पालन करावे. जीर्ण, खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावरील यंत्रणेकडे सुपुर्द करावेत. राष्ट्रध्वजांची परस्पर विल्हेवाट लावू नये. तसे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनी केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव

अकोला येथे केंद्रीय विद्यालयाची स्थापना झाली असून, पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या उपस्थितीत विद्यालयात दि. १५ ऑगस्ट रोजी प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर सकाळी १० वा. हा कार्यक्रम होईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन