जागतिक कौशल्य स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी : 'इंडिया स्कील कॉम्पीटीशन २०२६-२७' साठी नोंदणी सुरू! जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
जागतिक कौशल्य स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी :
'इंडिया स्कील कॉम्पीटीशन २०२६-२७' साठी नोंदणी सुरू!
जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
अकोला, दि. २४ : महाराष्ट्रातील कौशल्यधारक युवक-युवतींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याची चुणूक दाखवण्याची आणि जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील अत्यंत प्रतिष्ठित 'इंडिया स्कील कॉम्पीटीशन २०२६-२७' साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या स्पर्धेतील यशस्वी उमेदवारांना पुढे जागतिक पातळीवरील 'वर्ल्ड स्कील्स कॉम्पीटीशन'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सु. शेळके यांनी प्रसि ध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
*विविध ५६ कौशल्य क्षेत्रांमध्ये सहभागाची संधी*
या स्पर्धेत तंत्रज्ञान, औद्योगिक आणि सेवा क्षेत्राशी संबंधित तब्बल ५६ विविध कौशल्य प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टिम्स इंटिग्रेशन, ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, कॉंक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क आणि लँडस्केप गार्डनिंग यांसारख्या आधुनिक व तांत्रिक क्षेत्रांचा समावेश आहे.
*पात्रता आणि वयोमर्यादा निकष :*
या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा मुख्य पात्रता निकष निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सामान्य ५६ कौशल्यांसाठी - उमेदवाराचा जन्म हा १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असावा. तसेच टीम स्कील्ससाठी (ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, कॉंक्रिट कन्स्ट्रक्शन, लँडस्केप गार्डनिंग) उमेदवाराचा जन्म हा १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असणे बंधनकारक आहे.
*अर्ज कसा करावा?*
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील आय.टी.आय., पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी व पदवी महाविद्यालये, तसेच कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि कुशल युवकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही क ळ वि ण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा