अकोल्यात २१ ऑगस्टला 'महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर' युवकांसाठी इन्स्टाग्राम रील्स स्पर्धा; आकर्षक बक्षीसे
अकोल्यात २१ ऑगस्टला 'महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर'
युवकांसाठी इन्स्टाग्राम रील्स स्पर्धा; आकर्षक बक्षीसे
माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा'
अकोला दि. १३: मृद व जलसंधारणाची व्यापक जनचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा
प्रशासन आणि जलसंधारण विभागातर्फे २१ ऑगस्ट रोजी 'महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर'चे आयोजन
करण्यात आले आहे.
मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री
स्व. सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट
"जलसंधारण दिनानिमित्त राज्यात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान "जलसंधारण
सप्ताह" आयोजित करण्यात येणार आहे. तो प्रभावीपणे साजरा करण्याच्या दृष्टीने संबंधित
सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी
दिले आहेत.
जलसंधारणदिनानिमित्त व्यापक प्रमाणावर उपक्रम हाती घेतल्याची माहिती
जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी दिली. ते म्हणाले की, महावॉकेथॉनबरोबरच माती
आणि पाणी संवर्धन या विषयावर रील्स स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. यादिवशी लोगोचे अनावरण
व मृद व जलसंधारणाची शपथही घेतली जाणार आहे.
"महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता
अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानापासून सुरु होऊन
एसटी बसस्थानक, अशोक वाटिका चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टॉवर चौक ते पुन्हा क्रिकेट
क्लब मैदान असा ठरविण्यात आलेला आहे. अधिकाधिक अकोलेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी
केले.
रील स्पर्धा; आकर्षक बक्षीसे
जलसंधारण सप्ताहानिमित्त विभागातर्फे १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांसाठी
'मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. युवकांनी मृद व जलसंधारणाविषयी
३० ते ६० सेकंदाची इन्स्टाग्राम रील तयार करावी. त्याच्या सुरूवातीला नाव, जिल्हा नमूद
करावा. विभागाच्या इन्स्टाग्राम पेजला टॅग करून आपली रील इन्स्टाग्रामला पोस्ट करावी.
#SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरावा. जिल्हास्तरावरील विजेत्यांना बक्षिसे आणि मानचिन्ह
दिले जाईल. विजेत्यांना २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी अनुक्रमे तीन बक्षीसे, तसेच
महाराष्ट्र युवा जलदूत सन्मानचिन्ह मिळेल. सहभागासाठी क्यू-आर कोडही प्रसारित करण्यात
आला आहे.
संपूर्ण अभियान कालावधीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला,
वादविवाद स्पर्धा आणि 'एक शाळा - एक शोषखड्डा' यांसारखे उपक्रम राबवून पाणी बचतीचे
महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचेही श्री. मस्कर म्हणाले.
०००
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा