तृतीयपंथीयांसाठी शिष्यवृत्ती व बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि. ४ : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या 'सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहुड अँड एंटरप्राइज (स्माईल) या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप : शासनमान्य अथवा खासगी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये इयत्ता नववीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार हा भारतीय नागरिक असणे तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय तृतीयपंथी पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी https://transgender.dosje.gov. in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. शिष्यवृत्तीची संख्या मर्यादित असल्याने मागील शैक्षणिक वर्षातील गुणांच्या आधारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी १३ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून लाभासाठी आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
बीजभांडवल योजना : तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना 21 प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच त्याव्यतिरिक्त 12 प्रकारच्या व्यवसायांसाठी प्रशिक्षित असल्यास किंवा अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन आवश्यक साधने संचसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्जदार हा महाराष्ट्राचा किमान दहा वर्षांचा रहिवासी, वय वर्षे १८ ते ५० दरम्यानचा तसेच तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्रधारक असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत २५ हजार रुपये (लघुकर्ज), ५० हजार रुपये (मध्यम कर्ज) आणि २ लाख रुपये (दीर्घ कर्ज) यापैकी एका कर्जाचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत लाभार्थी हिस्सा ५ टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि उर्वरित ५० टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाईल.
अर्जासोबत व्यवसायासाठी आवश्यक परवाना, यंत्रसामग्री व साहित्याची कोटेशन्स अथवा बिले, जागेचा ७/१२ उतारा किंवा भाडेकरार, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा यांच्याकडे सादर करावा. योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजदरावर ३ टक्के सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप : शासनमान्य अथवा खासगी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये इयत्ता नववीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार हा भारतीय नागरिक असणे तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय तृतीयपंथी पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी https://transgender.dosje.gov.
बीजभांडवल योजना : तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना 21 प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच त्याव्यतिरिक्त 12 प्रकारच्या व्यवसायांसाठी प्रशिक्षित असल्यास किंवा अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन आवश्यक साधने संचसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्जदार हा महाराष्ट्राचा किमान दहा वर्षांचा रहिवासी, वय वर्षे १८ ते ५० दरम्यानचा तसेच तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्रधारक असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत २५ हजार रुपये (लघुकर्ज), ५० हजार रुपये (मध्यम कर्ज) आणि २ लाख रुपये (दीर्घ कर्ज) यापैकी एका कर्जाचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत लाभार्थी हिस्सा ५ टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि उर्वरित ५० टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाईल.
अर्जासोबत व्यवसायासाठी आवश्यक परवाना, यंत्रसामग्री व साहित्याची कोटेशन्स अथवा बिले, जागेचा ७/१२ उतारा किंवा भाडेकरार, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा यांच्याकडे सादर करावा. योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजदरावर ३ टक्के सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा