अकोल्यात प्राथमिक आरोग्य सेवेला नवी ऊर्जा! संयुक्त प्रशिक्षणातून आरोग्य पथक होणार अधिक सक्षम
अकोल्यात
प्राथमिक आरोग्य सेवेला नवी ऊर्जा!
संयुक्त
प्रशिक्षणातून आरोग्य पथक होणार अधिक
सक्षम
अकोला,
दि. १० : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम
आणि परिणामकारक करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष
प्रशिक्षण मोहिमेला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे.
या प्रशिक्षणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे
आशा (एएनएम एमपीडब्ल्यू सीएचओ आणि प्राथमिक आरोग्य
केंद्रातील इतर कर्मचारी अशा
संपूर्ण आरोग्य पथकाला प्रथमच एकत्रित प्रशिक्षण दिले जात आहे.
यापूर्वी प्रत्येक घटकाचे स्वतंत्र प्रशिक्षण होत असताना आता
७ ते १० सदस्यांचे
संपूर्ण पथक एकत्र प्रशिक्षण
घेत असल्याने परस्पर समन्वय वाढून ग्रामीण आरोग्य सेवा अधिक प्रभावी
होणार आहे.
प्राथमिक आरोग्य
केंद्राचे नेतृत्व आणि संपूर्ण आरोग्य
पथक सक्षम झाले तर जिल्ह्यातील
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल
घडू शकतो. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे
मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. त्या हेतूने प्रशिक्षणात माता व
बालमृत्यू शून्यावर आणणे, क्षयरोगाच्या कोणत्याही रुग्णाने उपचार अर्धवट सोडू नयेत, ३०
वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची रक्तदाब व मधुमेह तपासणी
करणे तसेच पुढील पाच
वर्षांत कर्करोगाचे स्क्रीनिंग पूर्ण करणे या महत्त्वाच्या
उद्दिष्टांवर विशेष भर दिला जात
आहे.
यासोबतच
आशा, एएनएम आणि एमपीडब्ल्यू यांनी
केवळ अहवाल भरण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष
गावपातळीवर जाऊन प्रत्येक पात्र
नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे कौशल्य
विकसित करण्यावर प्रशिक्षणात भर देण्यात येत
आहे.
विशेष
म्हणजे, प्रशिक्षण संपल्यानंतरही प्रशिक्षक 'मेंटर' म्हणून कर्मचाऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करतील, त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करतील आणि सेवेची गुणवत्ता
कायम राखण्यासाठी नियमित पाठपुरावा करतील.
जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे,
वैद्यकीय अधिकारी
डॉ. जयश्री बिपटे यांच्या नियोजनातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य
केंद्रांतील कर्मचाऱ्यांचे संयुक्त प्रशिक्षण सुरू करण्यात आले
आहे.
जिल्हा
प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षणाचे दस्तऐवजीकरण, मूल्यमापन आणि प्रभावी प्रसिद्धी
केली जाणार असून प्रत्येक प्रशिक्षणाची
माहिती, छायाचित्रे आणि यशोगाथा विविध
माध्यमे तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध
करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा
विस्तार माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा