शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामांचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
अकोला, दि. १५ : जिल्हा नियोजन
समितीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण
करण्यात आले आहे. नूतनीकरण झालेल्या कामांचे लोकार्पण राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभानंतर केंद्रीय विद्यालयाचा
प्रवेशोत्सव व विविध कार्यक्रम झाले. त्यात विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामांचेही लोकार्पण
झाले. आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधिक्षक
अर्चित चांडक, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ५० लक्ष रू. निधीतून नूतनीकरणाची
कामे पूर्ण करण्यात आली. त्यात विश्रामगृह येथील आवार भिंत, प्रवेशद्वाराचे बांधकाम
करण्यात आले आहे. कक्ष व परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे.
०००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा